मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत आज (दि. २२) होणार असून ही मालिका बरोबरीत सुटणार की भारताच्या खिशात जाणार याची उत्सूकता सर्व क्रिकेट प्रेमींना आहे.
परवा माउंट मौनगुनाई येथे झालेल्या लढतीत भारताने न्यूझीलंडला ६५ धावांनी पराभूत करताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मालिका जिंकण्यासाठी भारताला आणि मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी न्यूझीलंडला एका विजयाची आवश्यकता आहे.
आजच्या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन खेळणार असून त्याजागी टीम साऊथी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
यामुळे केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड संघ भारतीय संघाचा सामना अशा प्रकारे करतो, हे पाहणे मनोरंजक ठरणारे आहे.
दुसऱ्या लढतीत भारताच्या सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीतील मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरच फलंदाजी सर्व मदार असरणार आहे. त्याबरोबरीने रिषभ पंत, वाशिंग्टन सुंदर, दीपक हुडा यांच्या कामगिरीवर देखील क्रीडाप्रेमीचे लक्ष राहणार आहे.
आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने एकहाती लढती जिंकून देणार संजू सॅमसन हा देखील बेंचवर असून त्याला संधी मिळणार का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.
त्याबरोबरीने आजचा ‘बर्थडेबॉय’ उमरान मलिक हा देखील आजच्या लढतीत खेळण्यासाठी उत्सुक असणार आहे, मात्र त्याला संधी मिळणार का हे पाहणे देखील उत्सुकतेचे असणार आहे.