पुणे : तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून खून केल्याची घटना काल सोमवारी घडली. या घटनेत मोनेश घोगरे (वय २१, खंडोबा माळ, चाकण) खून झालेल्या तडिपारचे नाव आहे.
चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गुन्हेगार मोनेश घोगरे याला दोन वर्षांची तडीपारी झाली होती. त्याची तडीपारी दोन महिन्यांपूर्वी संपली होती.
तो रात्री ११ च्या सुमारास मित्राबरोबर घरी जात असताना चाकण मार्केट येथे त्याच्यावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर व इतर ठिकाणी वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मित्राच्या देखील पाठीवर मानेवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत.
त्याच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.