ढाका : भारताने बांगलादेश विरुद्धची मालिका गमावली असली आहे. या लढतीत देखील विजय मिळविण्यासाठी बंगलादेश देखील उत्सुक असणार आहे. या लढतीत जर भारत पराभूत झाला तर भारतीय संघाला क्लीन स्वीप देण्याचा विक्रम बांगलादेश संघाच्या नावावर होऊ शकणार आहे. मात्र, प्रतिष्ठा वाचविण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत ही लढत जिंकावीच लागणार आहे.
आजच्या लढतीत यजमान बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकताना भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा व कुलदीप चाहर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडले आहेत. यामुळे भारतीय संघात दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.रोहित व दीपक चाहर यांच्या ऐवजी भारतीय संघाकडून ईशान किशन व कुलदीप यादव याना संधी मिळणार आहे. आजच्या लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व के. एल. राहुल करणार आहे.
भारतीय संघ
शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
बांगलादेश संघ
अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), शकीब अल हसन, यासिर अली, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराज, इबादत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद