पुणे : भारताने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव करत ग्रुप २ च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगलादेशला हरवून ६ गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. भारताने झिम्बाब्वाचा पराभव करत भारताने पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव ११५ धावात गुंडाळला.
भारताने सुपर १२ फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरूद्ध आक्रमक सुरूवात केली. मात्र मधल्या षटकात भारताच्या पाठोपाठ तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिला. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ६१ धावा ठोकत भारताला १८६ धावांपर्यंत पोहचवले.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवन २५ चेंडू नाबाद ६१ आणि केएल राहुल ५१ यांच्या बळावर टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये ५ बाद १८६ धावा केल्या. झिम्बाब्वेचा डाव ११५ धावात आटोपला.
दरम्यान, सेमीफायनलमधील चार टीम्स निश्चित झाल्या आहेत. ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप२ मधून भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना हा बुधवारी (ता. ०९) न्युझीलंड व पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना हा गुरुवारी (ता. १०) भारत व इंग्लंड या संघात होणार आहे.