Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षक बँकेतील लूट थांबविण्यासाठी ८७ वर्षाचा योद्धा मैदानात..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 November 2022, 17:34

अजित जगताप

सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत लुटालूट करणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ८७ वर्षाचे बँकेचे माजी अध्यक्ष व  जेष्ठ सभासद ज. शा. यादव सभासद परिवर्तन पॅनेलचे योद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांच्या हस्ते श्री कुरणेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवण्यात आला आहे.

दोन महिन्यांपासून मनोमिलन साठी बलवंत पाटील यांच्या प्रयत्नातून  एकत्र आले आहेत. याचे समाधान वाटत असून शिक्षक बँकेत लुटालूट करणारी टोळी आहे. तिला हद्दपार करण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. याचे समाधान वाटले. असे स्पष्ट करून जेष्ठ सभासद श्री यादव म्हणाले,१९५५ सालापासून बँकेचा सभासद असून बँकेतील टोळी संपविण्यासाठी शिक्षक संघ व समिती एकत्रित आले आहेत. त्यामुळे सभासद परिवर्तन पॅनेलचा विजय निश्चित झाला आहे.

 

उदय शिंदे म्हणाले, शिक्षक बँकेत परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे आपल्या पॅनेलच्या २१उमेदवारांचा विजय ही काळ्या दगडावरील रेघ ठरली आहे. जुने व नवीन सहकारी शिक्षक एकविचाराने एकत्र आले आहेत.

मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील म्हणाले,हा प्रचाराचा शुभारंभ नसून हा विजयी मेळावा आहे, प्रत्येकांनी  जबाबदारीने मताधिक्य वाढीसाठी दहा दिवस परिश्रम घेतले पाहिजे.परिवर्तन हा संसाराचा नियम आहे तो लागू पडत आहे.शिक्षक बँक ही मातृ संस्था असून तिला वाचविण्यासाठी आपण तीन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली  एकत्र आलो आहे.मी फक्त निमित्त आहे.

आपल्या धडाकेबाज भाषणात शिक्षक नेते संभाजीराव थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांना वेळेची गणित शिकवणाऱ्या काहींना वेळ पाळता आली नाही.कोणीतरी बोलले पाहिजे. पूर्वी शिक्षकांना वेतन कमी होते आता सुधारणा झाली आहे. शिक्षक बँकेच्या अलीकडच्या काळात अपप्रवृत्ती बोकाळली आहे. आम्ही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करतो. तसेच कोल्हापूर व आता साताऱ्यात शिक्षक बँकेत लुटालूट पाहवत नाही. म्हणून परिवर्तन घडवून आणण्यासाठी कायमस्वरूपी एकत्र आलो आहे.

बँकेत सत्ता आल्यानंतर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देताना बँकेचे संरक्षण व संवर्धन शप्पथ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असा ही सल्ला दिला. महिला शिक्षिकांच्या वतीने सौ संगिता सणस म्हणाल्या, पहिल्यांदा भाषण करीत असून परिवर्तन घडवून येण्याची शक्यता दिसत आहे.सभासद परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार मताधिक्याने निवडून येतील, त्यासाठी तीन नेते एकत्र आले असून आदरणीय बलवंत पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वजण साक्षीदार बनले आहेत.

यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. तसेच जेष्ठ सभासद शहाजी धामणेरकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वभर रणनवरे, दिपक भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना एकजुटीने सर्व एकत्र आल्याचे कौतुक केले. सुभाष ढालपे, दिपक गिरी, सुभाष शेवाळे, शिवाजी शिंदे, रशिद मुजावर, धीरज गोळे, संजय खाडे, गजानन वारागडे, विजयाश्री मदने, दिलीप गंगावणे, सुरेश गावडे,आशा बोराटे,विक्रम डोंगरे, बाबूमिया आत्तार व मान्यवर शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, प्रास्तविक सी. एल. यादव यांनी केले तर शंकर देवरे यांनी आभार मानले.शिक्षकांच्या एकजुटीने हा विजय मेळावा झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया जयघोषाने प्रचाराचा शुभारंभ करताना श्री कुरणेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थी, पालकांनीही सभासद परिवर्तन पॅनेलला शुभेच्छा दिल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

छत्रपतींच्या इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा दिग्दर्शक निर्मात्यांना इशारा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.