IND vs AUS: रायपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना रायपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली. यासह त्यांनी टी-20 मालिकेवर कब्जा केला आहे. भारताने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. भारताने हा सामना 20 धावांनी जिंकला. या टी-20 मालिकेत भारत आता 3-1 ने आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. जयस्वालने भारताला शानदार सुरुवात करून दिली. त्याने 28 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. यानंतर ऋतुराज गायकवाडने 28 चेंडूत 32 धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर काही खास दाखवू शकले नाहीत. तो स्वस्तात बाद झाला.
या सामन्यातही रिंकू सिंग जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. चौथ्या टी-20 सामन्यात त्याने 29 चेंडूत 46 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 158 च्या आसपास होता. आपल्या खेळीदरम्यान रिंकू सिंगने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने मधल्या फळीत भारतीय संघाची कमान सांभाळली आणि भारताची धावसंख्या १७४ धावांपर्यंत नेली. रिंकूशिवाय जितेश शर्माही उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.
अक्षर पटेलचे 3 बळी
175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ केवळ 154 धावाच करू शकला. सलामीला आलेला ट्रॅव्हिस हेड चांगल्या फॉर्मात दिसत होता. मात्र, अक्षर पटेलने त्याला 31 धावांवर बाद केले. याशिवाय अक्षर पटेलनेही हार्डीला लवकर बाद केले. हार्डी केवळ 8 धावा करून बाद झाला. त्याचवेळी जोश फिलिप युवा गोलंदाज रवी बिश्नोईचा बळी ठरला. बेन मॅकडरमॉटही काही विशेष कमल दाखवू शकला नाही. अक्षर पटेलने त्याला 19 धावांवर बाद केले. मॅथ्यू शॉर्टला 19 चेंडूत 22 धावा करता आल्या. बेन द्वारशुईसला 1 धावांवर आवेश खानने बाद केले. मॅथ्यू वेडने 36 धावा केल्या मात्र तो सामना जिंकू शकला नाही.