पुणे : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-२० क्रिकेट सामना आज अहदमाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम लढतीला ‘फायनल’चे स्वरूप आले आहे.
हि मालिका जिंकण्यासाठी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चमक दाखविणे गरजेचे आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ भारतात भारताविरुद्ध पहिली मालिका जिंकण्यास उत्सुक आहे.
टीम इंडिया तिसऱ्या सामन्यासाठी संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सुमार कामगिरी करत असलेल्या इशान किशन व आघाडीच्या फळीत बदल करून पृथ्वी सावला संधी मिळणार का, याबाबतही उत्सुकता आहे. दुसरीकडे, आता या लढतीनंतर भारतीय संघाला टी-२० सामन्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सामन्याची वेळ :
संध्याकाळी ६.३० वाजता दोन्ही कर्णधार टॉससाठी मैदानात येतील. टॉस झाला की दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. टॉसनंतर अर्ध्या तासाने म्हणजेच रात्री ७.०० वाजता हा सामना सुरु केला जाईल.
Team India Playing XI : भारत : शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅपटण), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग