मुंबई : नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला ही धावसंख्या उभारला आली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका निर्णायक टप्प्यात आली आहे.
आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकलेला असल्याने मालिका बरोबरीमध्ये आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका देखील जिंकेल त्यामुळे दोन्ही संघ आज विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे.
टीम इंडियासमोर इंग्लंडची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. झटपट धावा काढण्याच्या नादात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. इंग्लंडने आतापर्यंत जेसन रॉय (४१), जॉनी बेअरस्टो (०), जो रूट (०), बेन स्टोक्स (२७), मोईन अली (३४), लियाम लिव्हिंगस्टोन (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६० ) हे फलंदाज झटपट धावा काढण्याच्या नादात लवकर बाद झाले.
दरम्यान, भारताकडून हार्दिक पांड्याने ४ बळी घेतले. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने २ आणि युझवेंद्र चहलने ३ तर रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांमध्येच आटोपला. भारताला विजयासाठी २६० धावांचे आव्हान मिळाले आहे.