IND vs AUS Live Update: अहमदाबाद: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या तीन विकेट पडल्या आहेत. विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर आहेत. सध्या भारताने 15 षटकांत तीन विकेट गमावत 97 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माविरुद्ध अपील केले. मात्र, पंचांनी त्याचे अपील फेटाळून लावले. त्यानंतर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. त्याच्या पहिल्या षटकात दोन चौकार मारल्यानंतर दुसऱ्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारला.
शुभमन गिल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अपयशी ठरला आहे. तो पाचव्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. लाँग ऑनवर उभ्या असलेल्या अॅडम झाम्पाने त्याचा झेल घेतला. गिलला सात चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. भारताला पहिला धक्का 30 धावांवर बसला. त्यानंतर रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. 10व्या षटकातील चौथ्या षटकात तो बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर तो ट्रॅव्हिस हेडकरवी झेलबाद झाला. रोहितने 31 चेंडूत 47 धावा केल्या.