ICC World Cup 2023 : पुणे : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर 2023) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना खेळला गेला. संपूर्ण भारताला जे अपेक्षित होत, त्या उलटच झालं. त्याशिवाय निराजानकबाब म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा वर्ल्डकपवर भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरणारे कपिल देव यांना सामन्याच आमंत्रण नव्हत. यावरुन काँग्रेसनं बीसीसीआयवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, स्वतः कपिल देव यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे.
कपिल देव यांच्याकडून नाराजी व्यक्त
कपिल देव म्हणाले की, मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात. घडल्या प्रकाराबाबत स्वतः कपिल देव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कपिल देव यांना आमंत्रण नव्हत
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केलं की, कपिल देव यांना बीसीसीआयनं अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषक फायनलसाठी आमंत्रित केलं नव्हतं, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.बेदींप्रमाणेच कपिल देव हे देखील त्यांची दिलखुलास मतं परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं समर्थन केलं होतं.
कांगारूंनी जिंकला विश्वचषक 2023
टीम इंडियानं स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. अशा परिस्थितीत टीम इंडियाच विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असं दिग्गजांसह चाहत्यांनाही वाटत होतं. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला आणि भारताचा पराभव झाला. या सामन्यात टीम इंडिया विजयी पताका फडकवणार असा विश्वास प्रत्येक भारतीयाला होताच, पण कांगारूंनी विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला रोखलं आणि विश्वचषकावर नाव कोरलं.