पुणे प्राईम न्यूज
पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. विश्वचषक २०२३ च्या या सामन्यासाठी जगभरातून लोक आले आहेत. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्ताननेही दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा टक्कर देणारी ठरू शकते. यासोबतच प्रेक्षकांसाठी खास बाब म्हणजे या सामन्यापूर्वी तीन दिग्गज गायक परफॉर्म करणार आहेत. अरिजित सिंग, शंकर महादेवन आणि सुखविंदर यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले, तर शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो सामन्यापूर्वी सराव करताना दिसला. जर गिल तंदुरुस्त असेल तर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते. यासोबतच रवींद्र जडेजाही संघाचा भाग असेल. इशान किशन, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. त्यांची जागा जवळपास निश्चित आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी संभाव्य खेळाडू –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन/शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.