धर्मशाला: अष्टपैलू हार्दिक पंड्या रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 चा भाग असणार नाही. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली असून त्याला बरे होण्यासाठी वेळ लागेल. मात्र, हार्दिक पांड्या बाहेर गेल्याने टीम इंडियाचा संपूर्ण समतोल बिघडला आहे. विश्वचषकातील चार सामने जिंकल्यानंतर भारताला प्लेइंग 11 मध्ये किमान दोन बदल करावे लागतील. हार्दिक खेळत नसल्यामुळे मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता बळावली आहे. आर अश्विनलाही तीन सामन्यांनंतर खेळण्याची संधी मिळू शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 बाबत संघ व्यवस्थापनाने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. भारताला आता फिनिशर म्हणून योग्य फलंदाज मैदानात उतरवावा लागणार असल्याने गोलंदाजीचे पर्यायही कमी झाले आहेत. सूर्यकुमार यादवचा अलीकडचा फॉर्म पाहता तो सहाव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर अद्याप फॉर्ममध्ये दिसला नाही. संघ व्यवस्थापन त्याच्यावर पूर्ण 10 षटके गोलंदाजी करण्याची जबाबदारी सोपवू शकत नाही. त्यामुळे मोहम्मद शमीला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
अश्विनलाही मिळू शकते संधी
न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान असणार आहे. न्यूझीलंडचा संघही चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल चारमध्ये कायम आहे. भारताला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समतोल राखायचा असेल, तर आर अश्विनला खेळवणे हाही पर्याय असू शकतो. अशा स्थितीत जडेजा सहाव्या क्रमांकावर जाऊ शकतो. शार्दुल 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल तर अश्विन 8 व्या क्रमांकावर खेळेल. अश्विनच्या खेळण्यामुळे भारताची फलंदाजी थोडी कमकुवत नक्कीच होईल, पण संघाकडे गोलंदाजीचे 6 पर्यायही असतील.
हेही वाचा:
देवेंद्र फडणवीसांनी विदर्भात जे विकास कामांचे दिवे लावले त्यावर चर्चा होणे गरजेचे: पृथ्वीराज चव्हाण
मोठी बातमी! विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट