मुंबई: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्समध्ये पुनरागमन करत आहे. शाहरुख खानची टीम केकेआरने आयपीएल 2024 साठी गौतम गंभीरची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत फक्त दोनदा ट्रॉफी जिंकली आहे आणि दोन्ही वेळा त्यांच्या संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता. गौतम गंभीरचा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे. त्याने अनेक वर्षे या संघाचे नेतृत्व केले आणि दोन वेळा २०१२ आणि २०१४ चे विजेतेपद मिळवून केकेआरला चॅम्पियन बनवले.
भारतीय क्रिकेट संघाचा हा माजी फलंदाज आयपीएल 2011 ते 2017 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रिकेट खेळला, परंतु तो आयपीएल 2018 मध्ये दिल्ली संघात परतला. त्यानंतर त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली. आता गौतम गंभीर आयपीएलमध्ये मेंटॉर म्हणून टीमसोबत राहतो. लखनऊ सुपर जायंट्स या संघाबरोबर गौतम गंभीरने मेंटॉर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली लखनऊ संघ आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत क्रमांक 3 वर होता, तर आयपीएल 2023 मध्ये देखील या संघ लीग स्टेजमध्ये क्रमांक 3 वरच राहिला.
Welcome home, mentor @GautamGambhir! ????
Full story: https://t.co/K9wduztfHg#AmiKKR pic.twitter.com/inOX9HFtTT
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 22, 2023
गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स प्रवेश केलेला आणखी एक नवीन संघ, जो आशिष नेहराच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2022 जिंकला आणि 2023 मध्ये फायनलमध्येही पोहोचला होता. परंतु, लखनऊचा संघ एकदाही फायनलमध्ये पोहोचू शकला नाही. आता गौतम गंभीर लखनऊ सोडून त्याच्या जुन्या आणि सर्वात यशस्वी संघ कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला आहे. अशा परिस्थितीत कोलकाता संघातील सर्वात जुना आणि यशस्वी लीडर परतल्यानंतर त्यात काय बदल होतात, हे पाहावे लागेल.
❤️❤️ LSG Brigade! pic.twitter.com/xfG3YBu6l4
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 22, 2023
गौतम गंभीरने ट्विटरवर एका ट्विटमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि त्यांच्या मालकाचे आभार मानले आहेत. त्याच वेळी, कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे की, “गौतम गंभीर ‘मेंटर’ म्हणून केकेआरमध्ये परतणार आहे आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासह संघाला पुढे नेणार आहे.”