हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाशालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदक पटकावल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूल फुलगाव येथे सोमवारी (ता. ०५) येथे १४ / १७ / १९ वयोगटातील मुलांच्या शालेय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये फैजन शकील शेख याने सुवर्णपदक तर शिलरत्न सिद्धार्थ गवळी याने रौप्यपदक पटकाविले. मुलींच्या शालेय बॉक्सिंग स्पर्धेत मृगाक्षी मिलिंद माने हिला रौप्यपदक मिळाले.
दरम्यान, विद्यालयांच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकीकात भर पडली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच विद्यालयाचे तसेच विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी सर्व खेळाडू व शारीरिक शिक्षण विभागाचे कौतुक केले.