पुणे : संपूर्ण जगासह भारताचे लक्ष लागून राहिलेल्या इंग्लंड व भारत यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टी२० विश्वचषक मधील भारत-इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य फेरीतील सामना ॲडलेड येथील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या सामन्यातील विजेता फायनलला पाकिस्तानशी खेळणार.
बादफेरीतील या सामन्यामधून जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतानाच आजच्या सामन्यामधून अंतिम सामन्यातील दुसरा दावेदार संघ कोण असेल हे स्पष्ट होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला तुल्यबळ इंग्लंडचा अडथळा पार करावा लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड या जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये एकहाती सामने जिंकवून देणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दडपणाखाली, मोक्याच्या क्षणी जे खेळाडू आणि जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असेल.
IND vs ENG: टीम इंडिया प्लेईंग-११
भारतीय संघाने कोणताही बदल आजच्या सामन्यासाठी केलेला नाही. झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेला संघच कायम ठेवला आहे.