Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतीय क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या पत्नीला भाजपकडून गुजरात निवडणुकीत तिकीट….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 November 2022, 13:33

गुजरात : भारतीय क्रिकेटचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या पत्नीला भाजपकडून गुजरात निवडणुकीत तिकीट देण्यात आले असून जामनगर उत्तर मधून त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ८४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. भाजप नेते भूपेंद्र यादव आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ही जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आगामी गुजरात निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले. या निवडणुकीत भाजपकडून भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी दोन टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा १ आणि दुसरा टप्पा ५ डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही ८ डिसेंबरला होणार आहे.

 

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोरबीचे माजी आमदार कांतीलाल अमृत्या ज्यांनी पूल कोसळल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली होती, त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ही यादी समोर आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर प्रमुख नेते पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

पाच वर्षांपूर्वी अत्यंत चुरशीच्या झालेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या आणि प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांना पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते. अहमदाबादमधील विरमगाममधून पटेल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्रसिंह चुडासामा, प्रदिपसिंह जडेजा या इतर दोन ज्येष्ठ नेत्यांनी ते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे जाहीर केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

उरुळी कांचन येथे सिंधी पंचायत व सेवा समितीच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.