उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांबो, क्रिकेट, बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव अजिंक्य कांचन यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंजली नितीन गोते या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय सांबो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे.
राज्यस्तरीय सांबो अजिंक्यपद स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १९ व २० ऑगस्टला झाली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध विद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता.
१७ वर्षीय जिल्हास्तरीय क्रिकेटच्या अंतिम स्पर्धेत डॉ. अस्मिता प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉन बॉस्को स्कूलचा पराभव करून चषक पटकाविले. तसेच १९ वर्षीय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
यश महामुनी या विद्यार्थ्यास कांस्यपदक..
१७ वर्षीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा लोणीकंद (ता. हवेली) येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये यश महामुनी या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकाविले आहे.
दरम्यान, महाविद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव अजिंक्य कांचन, सहसंचालिका ऋतुजा कांचन, संचालक जगदाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर प्राचार्या मोहिनी जगताप, उपप्राचार्या चव्हाण, शंकर वायकर, तानाजी गुलदगड आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे मार्गदर्शन लाभले.