उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील धनंजय मदने यांचीपुणे जिल्हा मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स २०२२ ची ३ री स्पर्धा १६ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होत आहेत.
या स्पर्धेत एकूण दहा क्रीडा प्रकारांची घेण्यात येणार आहेत. यामध्ये ॲथलेटिक्स, सायकलिंग, स्विमींग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल , टेबलटेनिस , कबबडी इत्यादी क्रिडा प्रकारात पुणे जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत आहेत, असे मास्टर गेम्स असोसिएशन पुण्याचे अध्यक्ष सहिंद्र भावले यांनी माहिती दिली आहे.
या स्पर्धेतून पात्र खेळाडूंची निवड ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान वाराणसी उत्तरप्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. तर सर्व खेळाडूंना सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू महेंद्र बाजारे यांनी सहभागी शुभेच्छा दिल्या आहेत.
सहभागी पुणे जिल्हा संघातील खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
१) पुरुष संघ – धनंजय मदने (कर्णधार), हरिश्चंद्र थोरात, महेंद्र बाजारे, सुजीत बडधे बाळकृष्ण गुरव, बापू चेमटे, रवींद्र नांगरे, जितेंद्र साळुंखे, सुहास साळुंखे, प्रकाश टेकाळे, अनिल कुमठेकर , सुरेश पाटोळे,बाळासाहेब नेवाळे ,गुरमित सिंग चौहान सतीश मडके, स्टीव्हन झुझार्ट, श्रीरंग खांडेकर,सचिन नडे, भगवान वाघमारे,प्रकाश निमसे,शिधेश्र्वर घेडे,संतोष मुकनाक,भाऊसाहेब महाडिक आजरा शेख, प्रवीण शितोळे,विश्वास माहुरकर, ग्यानसिंग चौहान, सतीश कुटे,ईमाम अत्तार , प्रदीप साळवे ,अविनाश भंडारी , नागनाथ कानगुडे
२) महिला संघ – रेखा आबनावे, स्मिता मस्तमर्डी,वर्षा पाटील,रुपाली पाटील , राधिका पाटील, अंजली वरटी, वर्षा गुद्दे ,माधुरी भागवत, संघ व्यवस्थापक महेंद्र बाजारे