गणेश सूळ
केडगाव, (पुणे) : विद्यार्थिनी एका तरी शालेय खेळात सहभाग घेतला पाहीजे. खेळात प्रविण्य मिळालेले खेळाडू विविध शेत्रात कार्यरत असून खेळाकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे. शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी केले.
स्व. पोपटराव किसनराव थोरात यांचे चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त खुटबाव येथे तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा व क्रीडाशिक्षक सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार थोरात बोलत होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढरे, सचिव सूर्यकांत खैरे, सरपंच गणेश शितोळे, राजेंद्र थोरात, महेंद्र गरुड, बालासाहेब तावरे, निखिल थोरात, संजय यादव, महेश थोरात, नानासाहेब डोबाळे, राजेंद्र खैरे, शिवाजी थोरात, संजय थोरात, सचिन शेलार, नानासाहेब थोरात, अनिल राजपुरे, योगेश थोरात, सकट मामा, प्राचार्य तांबे सर व अध्यापाक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
स्व. नानानी ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी १९८४ साली भैरवनाथ शिक्षण मंडळ ची स्थापना केली. आज या संस्थेत ३ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे या संस्थेत मुलापेक्षा मुलीची संख्या जास्त असल्याचेहि रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
या उलेखनिय कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते तुषार थोरात व पोलिस अधिकारी मटाले मॅडम याच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भैरवनाथ शिक्षण मंडळ खुटबाव याच्या वतीने तालुक्यातील २५ क्रीडाक्षेत्रातील शिक्षकाचा फेटा बांधून पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी १४ व १७ वर्ष वयोगटातील मुलांचे व मुलीचे कब्बडीचे सामने झाले जवळपास पन्नास शाळांनी सहभाग घेतला. सर्व विजेत्या गटांना माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान पत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवार सर यांनी केले तर आभार नवनाथ थोरात सर यांनी मानले.