Ind vs SA 2nd Test Gautam Gambhir: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 408 धावांनी पराभूत करत मालिका 2-0 अशा मोठ्या फरकाने जिंकली आहे. 549 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 140 धावांत गारद झाला. एवढ्या धावांच्या फरकाने भारताचा झालेला हा आजवरचा सर्वात मोठा कसोटी पराभव ठरला आहे. (Gautam Gambhir resign)

या पराभवासह दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, भारताला मायदेशात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे

Gautam Gambhir यांच्यावर टीकेची झोड
गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीतील या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर सर्वत्र टीका होण्यास सुरुवात झाली आहे. गंभीर यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही, अश्या प्रकारच्या टीका होत आहेत.

मुख्य प्रशिक्षकपदाचा तातडीने राजीनामा द्यावा
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा रेकॉर्ड फारसा चांगला नसल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे. या सलग पराभवानंतर सोशल मीडियावर गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
काही नेटकऱ्यांनी तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या दारुण पराभवानंतर गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही सुरू केल्या आहेत.
बीसीसीआय आणि गौतम गंभीर या पराभवावर काय भूमिका घेतात, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.







