मुंबई: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना सामन्याची फी म्हणून 7.5 लाख रुपये मिळणार असल्याचे शाह यांनी सांगितले आहे. त्याचवेळी, सर्व लीग सामने खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1.05 कोटी रुपये मिळतील. याबाबत शाह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
शाह यांनी म्हटले की, आयपीएलमधील सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरी साजरी करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, आमच्या क्रिकेटपटूंसाठी प्रति सामना 7.5 लाख रुपये मॅच फी लागू करताना आम्हाला आनंद होत आहे. एका हंगामात सर्व लीग सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1.05 कोटी रुपये मिळतील. प्रत्येक फ्रँचायझी या हंगामासाठी 12.60 कोटी रुपये मॅच फी म्हणून वाटप करेल. आयपीएल आणि आमच्या खेळाडूंसाठी हे नवीन पर्व आहे.
In a historic move to celebrate consistency and champion outstanding performances in the #IPL, we are thrilled to introduce a match fee of INR 7.5 lakhs per game for our cricketers! A cricketer playing all league matches in a season will get Rs. 1.05 crores in addition to his…
— Jay Shah (@JayShah) September 28, 2024