पुणे : टीम इंडियाचा पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सोमवारी (ता. १७) झाला. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला.
मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे एकापाठोपाठ एक असे चार गडी बाद केले. त्यात एक धावबाद होता. विराट कोहलीने टीम डेव्हिडचा अप्रतिम असा झेल पकडला आणि त्याआधी एक अॅश्टन अॅगरला धावबाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाला १८७ धावांचे लक्ष्य दिले होते. ब्रिसबेनच्या गाबा येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली.
लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार खेचले. मोठ्या मैदानांवर षटकार मारणे सोपे नक्कीच नाही. त्या पाठोपाठ रोहित व विराट कोहली यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा देखील लौकीकास साजेसा खेळ करू शकला नाही. त्याने केवळ २ धावा केल्या. दिनेश कार्तिक याने २० धावांचे योगदान दिले.
धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श व अॅरोन फिंच यांनी भारतीय गोलंदाजांना चोपत पॉवर प्लेमध्ये ६४ धावा काढल्या. १८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा करणाऱ्या मार्शचा सहाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्रिफळा उडवला.
दरम्यान, शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ धावांची गरज असताना मोहम्मद शमी गोलंदाजीला आला. त्याने पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सला बाद केले. विराट कोहलीने कमिन्सचा बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर एगर देखील शुन्यावर धावबाद झाला. शमीने पुढच्या चेंडूवर यॉर्कर टाकत इग्लिसचा त्रिफळा उडवला. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 1 चेंडूत 7 धावांची गरज होती. शमीने पुन्हा यॉर्कर टाकून रिचर्डसनचा त्रिफळा उडवला आणि भारताला सामना ६ धावांनी जिंकून दिला.