Akash Kumar Choudhary Record Breaking Fifty: भारतीय क्रिकेटमध्ये आज (रविवार, 9 नोव्हेंबर) रोजी एक अभूतपूर्व विक्रम रचला गेला आहे. रणजी करंडकाच्या प्लेट गटातील मेघालय विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात मेघालयच्या आकाश कुमार चौधरीने फर्स्ट-क्लास क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकत इतिहास रचला आहे.

अवघ्या 25 व्या वर्षी उजव्या हाताच्या या आक्रमक फलंदाजाने अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. यापूर्वी 2012 मध्ये इंग्लंडच्या वेन व्हाइट ने लीसेस्टरशायरकडून खेळताना 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आकाशने हा 13 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. भारतीय खेळाडूंत यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बंदेव सिंहने 15 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम रचला होता.
एक सलग आठ चेंडूंवर आठ षटकार ठोकले
आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तेव्हा मेघालयचा स्कोअर 576 धावांवर 6 गडी बाद असा होता. मैदानात उतरताच त्याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांवर तुटून पडत आक्रमक खेळी केली. त्याने सलग आठ चेंडूंवर आठ षटकार ठोकले, यातील सहा षटकार एका षटकात गोलंदाज लीमर डाबीच्या गोलंदाजीवर मारले.
पहा Video…
🚨 Record Alert 🚨
First player to hit eight consecutive sixes in first-class cricket ✅
Fastest fifty, off just 11 balls, in first-class cricket ✅
Meghalaya’s Akash Kumar etched his name in the record books with a blistering knock of 50*(14) in the Plate Group match against… pic.twitter.com/dJbu8BVhb1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 9, 2025
आकाश केवळ 14 चेंडूंमध्ये 50 धावांवर नाबाद राहिला आणि त्याच्या वादळी खेळीमुळे मेघालयने आपला डाव 6 बाद 628 धावांवर घोषित केला.
फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतके:
क्रमांक खेळाडू संघ प्रतिस्पर्धी चेंडू वर्ष
1 आकाश कुमार चौधरी मेघालय अरुणाचल प्रदेश 11 2025
2 वेन व्हाइट लीसेस्टरशायर एसेक्स 12 2012
3 मायकल व्हॅन वुरेन इस्टर्न प्रोविन्स बी ग्रिकुआलंड वेस्ट 13 1984/85
4 नेड एकर्सली लीसेस्टरशायर एसेक्स 14 2012
5 खालिद महमूद गुजरांवाला सरगोधा 15 2000/01
6 बंदेव सिंह जम्मू आणि काश्मीर त्रिपुरा 15 2015/16
आकाश कुमारची गोलंदाजीतही चमकदार कामगिरी
फक्त फलंदाजीच नव्हे, तर आकाश कुमार चौधरीने गोलंदाजीतही आपली छाप सोडली. नवीन चेंडूने गोलंदाजी करताच त्याने एक गडी बाद केला.
मेघालयचा हा विक्रमी खेळाडू सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला असून, त्याच्या ऐतिहासिक अर्धशतकामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पानाची भर पडली आहे.






