Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 April 2026, 11:34

Pune Accident : फुरसुंगी, ता. 1 : जेजुरी येथील खंडोबा देवदर्शन करून परतत असलेल्या एका कुटुंबावर दिवेघाटात काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत वडील आणि त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 30 मार्च रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला. या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सुंदर कैलास गंगावणे (वय 38) आणि त्यांची मुलगी अनन्या गंगावणे (वय 12, रा. उंड्री-पिसोळी, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर मुलगा सोहम गंगावणे (वय 8) हा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अश्विनी पवार यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हनुमंत बाबुराव मलकापुरे (वय 32, रा. नागेवाडी, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदर गंगावणे हे आपल्या मुलगी अनन्या व मुलगा सोहम यांना घेऊन 29 मार्च रोजी दुचाकीवरून जेजुरी येथे खंडोबा देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून मध्यरात्रीनंतर ते उंड्री येथील घरी परतत असताना हा अपघात घडला. पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट उतारावरून दुचाकी खाली उतरत असताना, सासवडकडून पुण्याकडे येणाऱ्या अशोक लेलँड ट्रक (MH12PQ9996) ने भरधाव वेगात दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

 

या धडकेत सुंदर गंगावणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मुलगी अनन्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मुलगा सोहम हा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता. अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी सोहमला तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलीस आणि खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने सुंदर गंगावणे आणि अनन्या यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. मृतदेहांचे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कमांड रुग्णालय, वानवडी येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने गंगावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी अश्विनी पवार यांनी ट्रक चालक हनुमंत मलकापुरे याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध निष्काळजी आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी मोटर वाहन अधिनियम 1988 आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.