Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandrakant Patil: बहरिनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळीचं आयुष्य बदललं! चंद्रकांतदादांनी लोहगावच्या ‘पैलवाना’चे पालकत्व स्वीकारले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 November 2025, 20:40
Chandrakant Patil: Sunny Phulmali's life changed after winning a gold medal in Bahrain! Chandrakant Dadi takes over as guardian of Lohegaon's 'wrestler'

Photo-Social Media

पुणे: घरची परिस्थिती अत्यंत (Chandrakant Patil) कठीण असतानाही जिद्द, चिकाटी आणि (Pune News) कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळीच्या (Sunny Fulmali) आयुष्यात आता आमूलाग्र बदल झाला आहे. लोहगावमधील पालावर राहून कुस्ती क्षेत्रात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले आहे. त्यांनी लोकसहभागातून सनीसाठी घर आणि सरावासाठी तालीम उभारण्याची, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची आणि स्वतःच्या पगारातून दरमहा 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

 

ना. पाटील यांनी सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगावमधील पालावर भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले आणि त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. या वेळी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॉबी टिंगरे तसेच भागातील नागरिक आणि पालावरील बांधव उपस्थित होते.

सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने सुवर्ण पदक जिंकले, ही गोष्ट प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. आज त्याने आई-वडिलांचे आणि आपल्या समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.”

ते पुढे म्हणाले, “सनीला लोकसहभागातून घर आणि कुस्तीच्या सरावासाठी तालीम बांधून दिली जाईल. शिक्षणासाठीही सर्वतोपरी मदत केली जाईल. माझ्या आणि पत्नीच्या उत्पन्नातून आम्ही सनीच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 50 हजार रुपये देऊ. त्याने आपले शिक्षण पूर्ण करून कुस्ती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे आणि पुढील काळात ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक मिळवावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे स्वामी धनगर, शरद माकर, किशोर शिंदे आणि अरविंद देवकर यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सनी फुलमाळीचे कर्तृत्व प्रकाशझोतात आले आहे. त्याबद्दल परिषदेला धन्यवाद देत ना. पाटील म्हणाले की, “अशा सामाजिक कार्यांसाठी आम्ही संघटनेला नेहमी सर्व प्रकारची मदत करू.”

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. “आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला होता. मात्र तो निर्णय केवळ 17 वर्षांवरील खेळाडूंना लागू आहे. आता सनीच्या निमित्ताने 17 वर्षांखालील खेळाडूंनाही सरकारी नोकरीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Local Bodies Election: 'Real test' of BJP candidates from tomorrow; Interviews for Pune North and South in the presence of Union Minister Muralidhar Mohol

Local Bodies Election: भाजप उमेदवारांची 'खरी परीक्षा' उद्यापासून; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे उत्तर आणि दक्षिणसाठी मुलाखती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.