नवी दिल्ली : भारतातील फुटबॅाल प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे, जागतिक फुटबॉल महासंघने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन केले आहे. ही कारवाई लगेचच लागू करण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघात बऱ्याच अनियमितता होत्या या कारणावरून फिफाने त्यांना निलंबित केले आहे.
फिफा ही जागतिक पातळीवरची फुटबॉलची सर्वोच्च संस्था आहे. हे निलंबन करण्याचे काम अनेक दिवसापासून सुरू होते. आता फिफाच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.एआयएफएफवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. FIDE च्या निलंबनामुळे, भारत यापुढे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही किंवा कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही, असे फिफाने सांगितले आहे.
आता 17 वर्षांखालील विश्वचषक आयोजित केला जाणार नाही. हा विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार होता. परंतु आता जागतिक फुटबॉल महासंघाने भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त करून निलंबित करून टाकल्याने ही विश्वचषक स्पर्धा भारतात होणार नाही.या निलंबनामुळे यंदा भारतात होणाऱ्या अंडर-19 महिला विश्वचषकावरही अंधाराचे ढग दाटले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे 2009 ते 2022 या कालावधीत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.