वेलींग्टन : टी २० विश्वकरंडक संपल्यानंतर भारताचा न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र वेलिंग्टन येथील स्काय मैदानावर न्यूझीलंड व भारतादरम्यान होणारा पहिला सामना पावसाच्या हजेरीने रद्द करण्यात आला आहे.
यामुळे तीन टी -२० सामन्याची ही मालिका कोण जिंकणार आगामी दोन लढतींवर अवलंबून असणार आहे.
सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. तरी देखील अधूनमधून पाऊस थांबू शकेल आणि उशीराने सामना सुरु होईल अशी क्रीडा प्रेमींना आशा होती. मात्र, पावसाने क्रीडाप्रेमींच्या आशेवर पावसाचे पाणी फेरले.
भारत व न्यूझीलंड दरम्यानची पुढील लढत रविवारी माऊंट माउंगानुईमध्ये होणार आहे. यावेळी हवामान चांगले राहण्याची अपेक्षा अपेक्षा आहे.
मात्र, सातत्याने बदलणारे हवामान हे क्रीडाप्रेमींसाठी चिंताजनक आहे.