Bhor News : भोर, पुणे : घरातील खिलार जातीच्या गायीचा मृत्यू झाला आणि याच गायीचा घरातल्या व्यक्तीप्रमाणे दहाव्याचा कार्यक्रम करत संपूर्ण गावाला पुरणाचं जेवण दिल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एक सदस्य गेल्याच्या भावनेतून तिचा दहाव्याचा विधी थाटात
बाजारवाडी (ता. भोर) येथील धनंजय रघुनाथ पोळ असे प्रगतीशील शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रगतीशील शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांच्या घरातील गाईचा खिलार जातीची राधा गाय होती. पोळ यांनी गायीची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या गायीचा शेवट गोड केला. वासरु ते २० वर्षांचा सहवासात राधा गायी ही पोळ कुटुंबाची सदस्य बनली होती. दहा दिवसांपूर्वी गायीचा मृत्यू झाला. तिचा घरातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून तिचा दहाव्याचा विधी थाटात करण्यात आला.
राधा या लाडक्या गायीचा माणसांप्रमाणे दहाव्याचा विधी केला. १० वर्षे मुलीप्रमाणे संभाळलेल्या राधा गायीचा मृत्यू झाला होता. ज्या प्रमाणे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे राधा गायीच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला. विधिवत पूजा करून,रा धा गायीचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून २१ गायींना पुरणपोळी देण्यात आली. तसेच खिलार जातीची गायी ज्यांच्याकडे आहे अशा २१ शेतकऱ्यांना फड्या, रतीबाचे भांडे भेट देत टॉवेल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, दहाव्याला संपूर्ण गावाला पुरणपोळीचे गाव जेवण देण्यात आले. जेवणांनानंतर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. दहाव्याच्या विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते. परिसरात सध्या शेतकरी धनंजय पोळ आणि त्यांच्या राधा गायीच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.