पुणे : वडगाव शेरी परिसरात खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) अटक केली. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. जीवन अण्णा बनसोडे (वय २६, रा. खराडी) हे संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात आकाश राजू कोरे (वय २४, रा. मोजेसवाडी, वडगाव शेरी) यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे.
वडगाव शेरी परिसरात इनऑर्बिट मॉलजवळ कोरे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल आहे. आरोपी बनसोडे याने कोरे यांना कोयत्याने धाकाने धमकावून दररोज हफ्ता देण्यास धमकावले. वर्षभरात बनसोडे याने कोरे यांच्याकडून २५ हजार रुपये उकळले. त्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून कोरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.