पुणे Pune : पुण्यात (Pune) वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune) मराठवाडा मित्र मंडळाच्या लॉ काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याने (Pune) शहरातील गोखलेनगर येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Pune) उसने दिलेल्या पैशातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Pune)
चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी रावसाहेब गर्जे (वय ४९, रा. पाटसरा, बीड) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज रावसाहेब गर्जे (वय २२, मुळ रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज हा पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेज येथे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो विद्यार्थी सहायक समितीच्या गोखलेनगर येथील वसतीगृहात राहावयास होता.
राजच्या ओळखीच्या एका तरुणाने त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते. ते तो परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर त्याने धमकी दिल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून निरुपम जोशी याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…
Solapur Crime : दोन मुलांचा खून करून जन्मदात्या आईनेही केली आत्महत्या ; पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांचा बळी, परिसरात हळहळ..