Lonavala Crime : लोणावळा (पुणे) : दुचाकी गाडीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणावळा शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (२० मे) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. लोणावळा शहर पोलिसांनी रविवारी आरोपीला बेड्या ठोकल्या. IYoung girl molested on the pretext of giving a lift in Lonavala; The accused was shackled)
मिळाली माहितीनुसार, एक २० वर्षीय तरुणी शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास रायवूड विभागातील आँक्झिलियम शाळेच्या जवळून घरी जात असताना मागून दुचाकी गाडीवर आलेला तरुण वैभव साठे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याने मी कुरवंडे गावाकडे चाललो आहे. तुला तिकडे सोडता असे सांगत दुचाकीवर बसविले. (Lonavala Crime) पुढे निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या भट्टी यांच्या बंगल्याच्या जवळ गाडी थांबवत तिच्या एकटेपणाचा फायदा घेत बोलण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न करू लागला, तसेच हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
आरोपीला ठोकल्या बेड्या
लोणावळा शहर पोलिस ठाण्यात या मुलीच्या फिर्यादीवरून हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पोलिस कर्मचारी हनुमंत शिंदे, मनोज मोरे, राजेंद्र मदने यांच्या पथकाने मुलींने वर्णन केलेले व नाव सांगितलेल्या मुलांचा शोध घेऊन अटक केली. (Lonavala Crime) याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala Crime : खुनाचा गुन्हा 24 तासांत उघड ; लोणावळा पोलिसांची कामगिरी…
Lonavala Crime | पवना धरणात बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यश…