राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धिविनायक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना यवत पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी केला संयुक्तरित्या तपास
अनिकेत दादासो ढोपे (वय २२ वर्ष रा. शेळगाव ता. इंदापूर) व धनंजय लक्ष्मीनारायण हगारे (वय २० , रा. अंथूर्णे, ता. इंदापूर, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Yavat News) याप्रकरणी श्रीधर अशोक भागवत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीधर भागवत हे सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर काम करतात. भागवत हे ३० सप्टेंबरला काम करीत असताना, मध्यरात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. (Yavat News) गाडीत पेट्रोल भरुन झाल्यानंतर त्यातील एकाने बॅगेतील पिस्तुल काढुन भागवत यांच्या कानाजवळ लावला.
त्यानंतर पिस्तुलचा धाक दाखवुन तुझ्याकडे असलेले पैसे काढ नाहीतर तुला गोळया घालीन अशी धमकी दिली. व भागवत यांच्या जवळील जबरदस्तीने ४ हजार रुपये काढून घेतले. (Yavat News) तर दुस-या व्यक्तीने धारदार लोखंडी कोयत्याच्या चपटया बाजुने मारहाण केली. व ते दोघे तेथून पसार झाले. याप्रकरणी भागवत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास करून आरोपी अनिकेत ढोपे व धनंजय हगारे या दोघांना अटक केली. (Yavat News) पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश