राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : सर्वत्र नवरात्रोत्सव चालू असून, दहिटणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांनी देखील महाभोंडल्याचा आनंद लुटला. शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणे येथे महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सादर केले विविध नृत्य प्रकार
यावेळी विद्यार्थ्यांनी भोंडल्याच्या विविध गाण्यांवर ताल धरत दांडिया-गरबा खेळण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार सादर केले. (Yavat News) यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका खेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना आपले पारंपरिक सण व उत्सव यांचे महत्त्व यांची माहिती व्हावी म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन शाळेमध्ये केले जाते, असे सांगितले.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. (Yavat News) यावेळी सरपंच आरती गायकवाड, शिक्षक पद्माकर धेंडे, विकास लवांडे,अरविंद पिसाळ, प्रमोद थोरात, शिक्षिका गीता थोरात, शिक्षिका जाधव, अंकिता पंडित यांसह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग सर्व अंगणवाडी कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती आणि मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मनोज जरांगे पाटील यवतनगरीत दाखल होताच हलगीच्या नादात जंगी स्वागत; फटाक्यांचीही आतिषबाजी
Yavat News : यवत येथे नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी