राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे यामुळे अपघातांना निमंत्रण देण्यासारखेच झाले आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गावर अपघाताचा धोका निर्माण होताना दिसत आहे. महामार्गावर मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असून, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अशाप्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि वाहनधारकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
कारवाई होणे गरजेचे
पुणे-सोलापूर मार्गावर अशा ओव्हरलोड वाहनांना कोणतीही नियमावली नसल्याने राजरोसपणे वाहनांमध्ये गरजेपेक्षा जास्त क्षमतेचा माल भरून नेला जातो. (Yavat News) उसाच्या वाड्याची वाहतूक होत असताना कोणताही आधार न घेता वाड्यावर बसून प्रवास केला जात आहे, अशा ठिकाणी कोणताही आधार न घेतलेले व्यक्ती मोबाईल हातात घेऊन बसत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गाड्या मार्गावरून नेताना हे वाहनचालक दुचाकी वाहनांची पर्वा करत नाहीत.
अनेकवेळा क्रश, वाळू, माती, वीट यांसह लोखंडी वाहतूक होत असलेल्या गाड्यांमधून अनेक लहान मोठे कण हे वाऱ्याने उडून दुचाकीस्वाराच्या डोळ्यात जातात. (Yavat News) यामुळे दुचाकीचे अपघात होतात. अनेकांना डोळ्याला इजा होत असून, यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
प्रत्येक मालवाहू वाहनाची मालवाहून नेण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे या वाहनांमध्ये कंपनीने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच मालाची वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली जाते. (Yavat News) या प्रकारामुळे अनेकवेळा अपघात होत असून, अशा वाहनचालक तसेच गाडीमालकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिक करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मणिपूर येथील घटनेचा दौंड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निषेध