Yavat News यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर चढउतार झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Yavat News) रस्त्यावर अत्यंत धोकादायक चढउतार झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Yavat News)
यवत येथे जिल्हा परिषद शाळेजवळ असलेला उड्डाणपूल संपताच पुण्याकडून सोलापूरच्या बाजूने जाणाऱ्या येणाऱ्या बाजूकडील रस्त्यावर पडलेला धोकादायक पद्धतीने चढउतारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याठिकाणचा रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पालखी पूर्वीच या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम करण्यात आले होते.
परंतु काही दिवसातच या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. खड्डा पडलेल्या परिसरात रस्त्याचा उतार चालू होत असल्याने वाहनचालकांना खड्डा चटकन लक्षात येत नाही. या खड्ड्यामुळे दुचाकी गाड्यांना अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने यामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ दिवस रात्र मोठ्या प्रमाणात चालू असते. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साठवून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी दुरावस्था झालेली असून महामार्ग प्रशासनाची पेट्रोलिंग करणारी वाहने याकडे जाणून- बुजून दुर्लक्ष करत आहेत काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत, पाऊस होण्याअगोदर महामार्ग प्रशासनाने याची योग्य त दखल घेऊन लवकरात लवकर सदर रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी प्रवासी व नागरिक करीत आहेत.