राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत मणिपुर येथे आदिवासी महिलांवर अत्याचारावर बीजेपीशासीत माणिपुर राज्य सरकार त्वरीत बरखास्त करण्यात यावे. अशी मागणी दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.(Yavat News)
सरकारला त्वरीत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.
मणिपुर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात मणिपुर पोलीस व राज्य शासन हे आदिवासी महिलांच्या विरोधात व आरोपी, दंगलखोरांच्या समर्थनात दिसू येत असून मणिपुर येथील हिंसा ही बीजेपी शासन पुरस्कृत आहे. आणि घटना घडून तब्बल ७७ दिवस उलटल्यावर देशाच्या पंतप्रधानांनी यावर अश्रू ढाळणे हे खूप खेदजनक व संतापजनक आहे.(Yavat News)
दरम्यान, अनेक ठिकाणी दंगे होत असून अशा परिस्थीतीत केंद्र सरकार व राष्ट्रपती यांनी मणिपुर येथील राज्य सरकारला त्वरीत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, तसेच अत्याचार पिडीत महिलांना न्याय मिळावा अशी मागणी दौंड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.(Yavat News)
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुका अध्यक्षा सारिका भुजबळ, तालुका कार्याध्यक्षा राजश्री दोरगे, तालुका संघटक पायल पवार, छाया शिंदे, रेखा जाधव,पंचफुला जाधवर, पुष्पा बनकर, भरत भुजबळ,(Yavat News)
पोपट लकडे, दत्ता जगताप, निलेश बनकर, उमेश म्हेत्रे यांसह जिजाऊ ब्रिगेडचे महिला पदाधिकारी उपस्थित होत्या