राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : मॅजिक ग्लास प्रा. लि. यवत व हरितवारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भुलेश्वर पायथा येथील भरतगाव रोड 100 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हरितवारी फाउंडेशनच्या वतीने वर्षभर रक्तदान शिबिर, झाडे लावा झाडे जगवा, ग्राम स्वच्छता अभियान यासारखे विविध उपक्रम वर्षभर राबवले जात आहेत.
९ प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड
या अभियानातीलच एक निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी भविष्यातील गरज ओळखून यवत येथील मॅजिक ग्लास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या साह्याने भुलेश्वर पायथालगत असलेल्या भरतगाव येथील वन विभागात कंपनीकडून देण्यात आलेल्या एकूण ९ प्रकारची देशी वृक्ष देण्यात आले. (Yavat News) यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, कदंब, शिसम, आवळा, चिंच, जांभूळ, फणस यासारख्या १०० मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वृक्षारोपणासाठी मॅजिक ग्लास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि वनविभागाचे कर्मचारी, यांसह हरितवारी फाउंडेशनचे सभासद उपस्थित होते. (Yavat News) मॅजिक ग्लास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून झाडांच्या माध्यमातून फार मोठी मदत मिळाली असून, हरितवारी फाउंडेशनच्या वतीने कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कंपनीने दिलेल्या सर्व झाडांची निगा राखण्याचे व काळजी घेण्याची हरितवारी फाउंडेशनच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली.