Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने विवाहितेवर खुनी हल्ला ; आरोपीला ६ वर्षांची सक्तमजुरी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 31 July 2023, 18:55

Shirur News लोणी काळभोर : शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने विवाहितेवर चाकूने खुनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने तब्बल ९ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला ६ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांनी दिले आहेत. (Shirur News)

अलीम यासीन शेख (वय ३४, रा दत्तवाडी, निमोणे ता. शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार हा ११ मार्च २०१७ रोजी घडला होता. (Shirur News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सून घराच्या पाठीमागे साफसफाईचे काम करत होती. तेव्हा आरोपी अलीम शेख तेथे आला आणि फिर्यादी यांच्या सूनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा तिने नकार दिला. दरम्यान, शरीरसुखास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी अलीम शेख याने फिर्यादी यांच्या सुनेला खाली पाडले व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर चाकूने वार केले.

 

सून जोरजोराने ओरडत असल्याच्या आवाज आल्यानंतर फिर्यादी त्वरित घराच्या पाठीमागे गेल्या असता, सून रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले आणि आरोपी अलीम शेख हा तेथून पळून जाताना आढळून आला. नागरिकांच्या मदतीने सुनेला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेव्हा सुनेला माहिती विचारली असता, तेव्हा हे धक्कादायक कारण समोर आले आहे.  (Shirur News)

याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपीच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अलीम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मिलिंद दातरंगे यांनी न्यायालयात युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ६ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश न्यायाधीश श्याम चांडक यांनी दिले आहेत.

तब्बल ९ साक्षीदार तपासले

न्यायालयाने या खटल्यात तब्बल ९ साक्षीदार तपासले आहेत. या खटल्यात सरकारी वकील ॲड. मिलिंद दातरंगे यांना शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रभारी अधिकारी संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. ए. क्षीरसागर, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, महिला अंमलदार रेणुका भिसे व एस. बी. रणसर यांची मदत मिळाली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Pachgani News : विहिरीत उडी घेऊन विवाहितेने संपविले जीवन; पाचगणीतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.