जीवन शेंडकर
Yavat News : यवत : शेतकऱ्यांसोबत वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. या दिवसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. दौंड तालुक्यातील राहू परिसरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. राहू गावाला प्रदक्षिणा मारत बैलजोडीची ढोल, ताशा, तुतारी, डीजेच्या तालात गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.
कुल कुटंबियांनी केले बैलजोडीचे पूजन
या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकले जाते. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.(Yavat News ) गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो.
प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.
बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. (Yavat News ) महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी निवासस्थानापासून दोन किलोमीटर राहू गावाला प्रदक्षिणा मारत बैलजोडीची ढोल, ताशा, तुतारी, डीजेच्या तालात गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढली.
माजी आमदार रंजना सुभाष कुल, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष कांचन राहुल कुल यांनी बैलजोडीचे पूजन करून नैवेद्य दिला. याप्रसंगी प्रज्वल शिंदे, नवनाथ इंगळे, मयूर शेलार, समर्थ चव्हाण, प्रद्युम्न बंड, आदित्य काळे आदी मित्रपरिवार नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : जलपर्णी समस्या व अतिरिक्त पाणी वापराबाबत सकारात्मक चर्चा; आमदार राहुल कुल यांची माहिती