राहुलकुमार अवचट
Yavat News | यवत : रामनवमी निमित्त दरवर्षी पारंपारिक पद्धतीने यवत परिसरात मोठ्या उत्साहात साजरी आहे. तर यवत येथील इंदिरानगर येथे राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी १० वा. इंदिरानगर वस्तीत युवा नेते गणेश शेळके यांच्या उपस्थितीत डॉ. रवींद्र झुरुंगे यांच्या हस्ते मूर्तीला अभिषेक व आरती करण्यात आली. तर सायंकाळी ७ वा. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या तेजस्वी व मनमोहक प्रतिमेने नागरिकांचे लक्ष वेधले…
मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या तेजस्वी व मनमोहक प्रतिमेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लोणीकंद येथील श्रीनाथ लाईव्ह अँड साउंड मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी तरुणाईने मोठ्या प्रमाणात नाचण्याचा आनंद घेतला. संपूर्ण इंदिरानगर वस्तीत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तर साईकृपा डेकोरेशन यांच्यावतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती.
दरम्यान, रामनवमी निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन उत्सवाचे आयोजन सार्वजनिक रामनवमी उत्सव इंदिरानगर यवत यांच्या वतीने करण्यात आले होते. इंदिरानगर येथे प्रथमच प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य मिरवणूक होत असल्याने लहान – मोठ्यांसह सर्व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Yavat News : यवत येथील प्रसिद्ध व्यापारी संजय शहा यांना मातृशोक