राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत, (पुणे) : यवत (ता. दौंड) येथील समाजिक कार्यकर्ते स्वप्निल नामदेव शिर्के यांची अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका युवक कोषाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
अखिल भारतीय युवक मराठा महासंघाची मासिक आढावा बैठक उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नुकतीच पार पडली पार पडली. यावेळी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख गोरख कामठे, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर,(Yavat News) जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे यांच्या हस्ते देण्यात आले. जुलै २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर-मंतरवर होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या एक दिवसीय आंदोलनाची चर्चा, पूर्वतयारी यामध्ये करण्यात आली
सदर आंदोलनाला जिल्ह्यातून शेकडो युवक येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी दिली.
यावेळी पुरंदर तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. चंदन मेमाणे, पुरंदर तालुका युवक अध्यक्ष संदीप मोकाशी, दौंड तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल राजवडे, शिरूर -हवेली मराठा महासंघ युवक अध्यक्ष अतुल कुंजीर, दौंड तालुका मराठा महासंघ उद्योग व्यापार आघाडीचे (Yavat News) नवनिर्वाचित कार्याध्यक्ष अमोल चौंडकर, नवनिर्वाचित दौंड तालुका युवक संपर्कप्रमुख चंद्रकांत आखाडे, नवनिर्वाचित युवक सरचिटणीस समीर गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवडीनंतर बोलताना स्वप्निल शिर्के म्हणाले,(Yavat News) “राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष रणजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यात सर्वत्र समाज संघटित करून सर्वांगीण विकास करण्याचे काम करणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : कामिका एकादशीनिमित्त डाळिंब जिल्हा परिषद शाळेत रंगले पालखी सोहळ्याचे मेंढ्यांचे रिंगण