राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी पुण्यात प्रवास करतात. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून यवत येथील पीएमपीएमएल बस स्थानकावरील पास केंद्र बंद असल्याने, यवतवरून हडपसरकडे जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडत आहे. अनेक प्रवासी बस थांब्यावर येऊन थांबतात; परंतु बस कधी येईल याची वेळ निश्चित नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.
वेळापत्रक नसल्याने प्रवाशांची तारांबळ
यवत ते हडपसर या बस फक्त सकाळच्या वेळेत असतात. यवत येथून जाणाऱ्या प्रवाशांना वरवंड ते हडपसर या बसची वाट पाहण्यासाठी उभे राहावे लागते. (Yavat News) वरवंड येथून येणारी बस नक्की कधी येईल याबाबत कोणतेही फलक नसल्याने, बस कधी येईल याचा अंदाज येत नाही. प्रवासी काही कामानिमित्त जवळपास गेल्यास तेवढ्या वेळात बस निघून जाते आणि पुन्हा बराच वेळ प्रवाशांना पुढच्या बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते. यासाठी बस थांब्यावर वेळापत्रक लावण्याची मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : कोरमअभावी यवत येथील विशेष ग्रामसभा तहकूब..
Yavat News : आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देत, नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार