राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : यवत (ता. दौंड) स्टेशन येथे रेल्वे ओलांडण्यासाठी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे यवत येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार राहुल कुल यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी
यवत स्टेशन येथील उड्डाणपूल मंजूर करावा, अशी मागणी यवत ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी यांच्या वतीने वारंवार होत आहे. पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी असलेल्या भुयारी मोरीत पाणी साठते. (Yavat News) यामुळे वयोवृद्ध नागरिकांना, शाळेतील मुला-मुलींना येण्या-जाण्यासाठी त्रास होतो तसेच या मोरीतून शेतमालाची वाहतूक करण्यास अडचणी निर्माण होतात.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उत्तरेकडे जाणारा हा जवळचा रस्ता असल्याने यवत स्टेशन याठिकाणी उड्डाणपूल व्हावा, (Yavat News) अशी मागणी यवत येथील युवा नेते किरण सुभाष यादव, ह.भ.प. दीपक महाराज मोटे, सामाजिक कार्यकर्ते युवराज मेहता, धनंजय यादव यांनी निवेदनाद्वारे आमदार राहुल कुल यांच्याकडे केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भुलेश्वरला भक्तीचा महापूर
Yavat News : यवत ग्रामीण रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी; 36 तासांत 13 महिलांची यशस्वी प्रसूती