Yavat News : यवत : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळाचे येत्या शनिवारी (ता. १० प्रस्थान होणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी यवत येथे भेट दिली.
१५ जून रोजी दौंड तालुक्यात पालखी सोहळ्याचे आगमन
तर १५ जून रोजी दौंड तालुक्यात आगमन होणार आहे. सोहळ्याचा पहिला मुक्काम यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात असणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मुक्कामाचे ठिकाण, नविन पालखी तळ, शौचालय उभारण्याचे ठिकाण, वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी स्नानाचे ठिकाण, राष्ट्रीय महामार्ग लगत असणा-या नाल्यामध्ये, भुयारी मार्गात पाणी साचणारे ठिकाण आदी ठिकाणांची पाहणी केली. (Yavat News) सरपंच समीर दोरगे यांनी यवत येथील पालखी सोहळा नियोजनाबाबत माहिती यावेळी अधिकाऱ्यांना दिली.
यवत बाजार मैदान येथील पालखी तळाच्या परिसरात सावली देणा-या वृक्षांची लागवड करावी जेणे करून वारकरी व नागरिकांना सावली मिळेल, परिसर सुशोभित होऊन निसर्ग संवर्धनही होईल ग्रामपंचायत यवत आणि सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्याबाबत सूचना दिल्या. शासनाकडून बांधण्यात आलेली पालखीतळ इमारत नियमित वापरात नसल्याने व बंदिस्त नसल्यामुळे देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे सांगण्यात आले असता तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी पालखी तळ सुधारणेसाठी आवश्यक काम नागरीसुविधा अंतर्गत करण्यात यावे,तसा प्रस्ताव ग्रामपंचायने जिल्हा परिषदेकडे द्यावा असे सांगितले. (Yavat News) राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात पाणी साठते, पालखी काळात पाणी साठणार नाही याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने घ्यावी या बाबत ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करावा अशा सूचना दिल्या.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत विभाग) सचीन घाडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे , तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव,विस्तार अधिकारी बाबा मुलाणी, बाबर, रसाळ, ग्राम विकास अधिकारी बबन चखाले, संदीप ठवाळ, वसंत सापळे उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परंपरेनुसार भांडगाव गावातच थांबविण्याची मागणी
Yavat News : बोरीभडक येथे डीजे वाजवल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल