राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : मराठा आरक्षणासाठी पुणे दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांचे यवतनगरीत हलगीच्या नादात जंगी स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळी राजगुरुनगर येथील जंगी सभा आटोपून पुणे-सोलापूर महामार्गाने सभेसाठी बारामतीला जात होते. त्यावेळी साडेचारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा यवत भुलेश्वर फाटा येथे दाखल होताच अखिल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी व हलगीच्या नादात जंगी स्वागत करण्यात आले.
झालेली गर्दी लक्षवेधी
भुलेश्वर फाटा ते यवत गाव अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी व यांची एक छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तरुणांनी गर्दी केली होती. (Yavat News) यावेळी यवत गावात मुख्य चौकात आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
आरक्षणासाठी राज्यात मराठ्यांचे मोहळ उठले असून, मराठ्यांचे आंदोलन राज्यकर्त्यांना झेपणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. (Yavat News) आरक्षण न दिल्यास २४ तारखेनंतरचे आंदोलन सरकारला पेलवणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. कोणतीही राजकीय शक्ती मागे नसताना झालेली गर्दी लक्षवेधी होती. वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत येथे नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Yavat News : राहुमध्ये ढोल, ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बैलांची वाजतगाजत मिरवणूक