Yavat News : यवत : आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देवून नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना बोरीभडक (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल
इस्माईल शब्बीर सय्यद (रा. बोरीभडक चंदनवाडी, ता. दौंड, जि. पुणे. मूळ रा. हागलूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीने आज (ता. ९) यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२३ ते ८ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीच्या घराशेजारी आरोपी इस्माईल सय्यद हा त्याच्या कंटूबासोबत राहण्यास आहे. (Yavat News ) आरोपी इस्माईल सय्यद हा पिडीत मुलीच्या घरी अधूनमधून येत होता. त्यामुळे पिडीत मुलगी आणि आरोपी यांची ओळख होती.
दरम्यान, आरोपी इस्माईल सय्यद याने जुलै महिन्यात पिडीत मुलगी घरामध्ये एकटी असताना, घरात घुसून मुलीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला तसेच तुझ्या आई-वडीलांना जिवंत सोडणार नाही, (Yavat News ) अशी धमकी त्याने मुलीला दिली. या धमकीने पिडीत मुलगी घाबरून गेल्याने तिने घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपी वारंवार पिडीत अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना येत होता. आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत होता.
दरम्यान, मंगळवारी (ता. ८) मुलगी नेहमीप्रमाणे पाच वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आली. मुलगी घरी आल्याचे पाहिल्यानंतर आरोपी सय्यद हा घरी आला. पिडीत मुलीशी लगट करू लागला. पिडीत मुलगी जोरात आरेडल्याने आरोपीने तिचे तोंड दाबले. त्यानंतर डाव्या हाताने खिशातून चाकू काढून मुलीच्या गळ्याला लावला व शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
याप्रकरणी पिडीत मुलीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी इस्माईल सय्यद याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Yavat News ) या प्रकरणाचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.
पिडीत कुटुंबास गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार बाळासाहेब कांचन आणि अमित सतीश कांचन यांनी धीर देऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले व कायदेशीर गुन्हा दाखल करून घेतला.