Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देत, नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 August 2023, 15:03

Yavat News  : यवत : आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देवून नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना बोरीभडक (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवत पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल

इस्माईल शब्बीर सय्यद (रा. बोरीभडक चंदनवाडी, ता. दौंड, जि. पुणे. मूळ रा. हागलूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीने आज (ता. ९) यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२३ ते ८ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीच्या घराशेजारी आरोपी इस्माईल सय्यद हा त्याच्या कंटूबासोबत राहण्यास आहे. (Yavat News ) आरोपी इस्माईल सय्यद हा पिडीत मुलीच्या घरी अधूनमधून येत होता. त्यामुळे पिडीत मुलगी आणि आरोपी यांची ओळख होती.

 

दरम्यान, आरोपी इस्माईल सय्यद याने जुलै महिन्यात पिडीत मुलगी घरामध्ये एकटी असताना, घरात घुसून मुलीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला तसेच तुझ्या आई-वडीलांना जिवंत सोडणार नाही, (Yavat News ) अशी धमकी त्याने मुलीला दिली. या धमकीने पिडीत मुलगी घाबरून गेल्याने तिने घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपी वारंवार पिडीत अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना येत होता. आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत होता.

दरम्यान, मंगळवारी (ता. ८) मुलगी नेहमीप्रमाणे पाच वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आली. मुलगी घरी आल्याचे पाहिल्यानंतर आरोपी सय्यद हा घरी आला. पिडीत मुलीशी लगट करू लागला. पिडीत मुलगी जोरात आरेडल्याने आरोपीने तिचे तोंड दाबले. त्यानंतर डाव्या हाताने खिशातून चाकू काढून मुलीच्या गळ्याला लावला व शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

याप्रकरणी पिडीत मुलीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी इस्माईल सय्यद याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Yavat News )  या प्रकरणाचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.

पिडीत कुटुंबास गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार बाळासाहेब कांचन आणि अमित सतीश कांचन यांनी धीर देऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले व कायदेशीर गुन्हा दाखल करून घेतला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : यवत परिसरात बिबट्याची दहशत

Yavat News : पारगाव (गांडाळवाडी) येथे झालेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावासाची शिक्षा..

Yavat News : भुलेश्वर पायथा येथे 100 देशी झाडांचे वृक्षारोपण; हरितवारी फाऊंडेशन व मॅजिक ग्लास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Accident News : चाकण येथे भरधाव हायवा ने दिलेल्या धडकेत वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू ;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.