यवत: यवत ग्रामपंचायतची ३१ रोजी कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा आज (दि. ३) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी गावातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यवत ग्रामपंचायतची तहकूब झालेली ग्रामसभा सकाळी ११ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.
ग्रामसभेपूर्वी संस्कृती कैलास अवचट, सुजल सतीश शेळके, विवेक पंकज ढमढेरे,आदित्य राहुल कुदळे, समीर जनार्दन लकडे, दिनेश नवनाथ सोनवणे, प्राची शंकर अवचट, मयुरी आण्णा कुदळे, वैष्णवी प्रवीण झोपे, प्रियंका बाविस्कर, गौरी राम चंदनकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यानंतर ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी सभेचा अजेंडा वाचून दाखविला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्राला अनुसरून ग्रामपंचायत कराची फेर आकारणीबाबत माहिती देताना लवकरच ग्रामपंचायत याबाबत सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले. ग्रामसभेवेळी समस्यांचा एकही अर्ज न आल्याने व उपस्थित ग्रामस्थांमधून कोणतेही प्रश्न न आल्याने तहकूब ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सरपंच समीर दोरगे व ग्रामपंचायत प्रशासनाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याने ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे, राजेंद्र शेंडगे, इम्रान तांबोळी, गौरव दोरगे, ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी कुदळे यांसह धवल गांधी, विकास दोरगे, संजय दोरगे, विष्णू कुदळे, अक्षय जाधव , विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते