यवत, ता. (पुणे): पुणे-सोलापूर महामार्गावर यवत (Yavat Accident) हद्दीतील कुंदा चहाच्या समोर दोन चारचाकी गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. 15) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही गाड्या निघाल्या होत्या. पुण्याकडून सोलापूरच्या बाजूने स्विफ्ट गाडी निघाली होती. यावेळी पाठीमागे एस क्रॉस गाडी होती. यवत हद्दीतील कुंदा चहाच्या समोर असलेल्या दुभाजकावरून स्विफ्ट गाडी वळण घेत असताना पाठीमागे असेलेल्या एस क्रॉस गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व समोर असलेल्या स्विफ्टला जोरदार धडक दिली.
दरम्यान, पाठीमागून धडक दिल्याने स्विफ्ट गाडी हि महामार्गावर एका बाजूने पलटी झाली. सुदैवाने चालक व गाडीतील व्यक्तींना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दर्शन म्हस्के, वनराज खेडेकर, अभिजीत सुतार, ऋषी म्हस्के, साई म्हस्के, यांनी व आदी नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करू पलटी झालेली गाडी सरळ केली.







