लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.
आर्थिक अनियमितेमुळे मागील तेरा वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात पॅनल प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, महादेव कांचन, प्रताप आण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर हे सहकारातील प्रमुख नेते, तर उमेदवार म्हणून कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे, राजीव घुले, आप्पासाहेब काळभोर, कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर यांचे चिरंजीव सागर काळभोर, माजी संचालक महादेव कांचन यांचे चिरंजीव अजिंक्य कांचन, माजी संचालक सुभाष जगताप, संतोष आबासाहेब कांचन, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, फुरसुंगीचे अमोल हरपळे, दौंड पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे असे अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दोन्ही पॅनलमधील उमेदवार आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने या निवडणुकीत पैशाचा वापर मोठया प्रमाणात होणार आहे. दोन्ही पॅनलमधील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पूर्व हवेलीसह संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
यशवंत सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमितेमुळे २०११ साली बंद पडला. त्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु, कारखाना सुरू झाला नाही. बंद कारखान्याची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत उमेदवारी अर्ज कमी येतील, अशी अपेक्षा असताना तब्बल ३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
आज मंगळवारी (ता.२७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३ वाजेपर्यंत बऱ्याच इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले होते. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत एक तास वाढवली होती. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. हे ४२ उमेदवार वगळता अजून १० – १२ उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून त्यांची निश्चित संख्या समजू शकली नाही.
दरम्यान, पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. कारखान्याची मतदान प्रक्रिया ९ मार्चला सकाळी ९ ते ५ या वेळेत पार पडणार आहे. तर १० मार्चला सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत हवेलीसह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याने, ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गट क्र १
अजिंक्य महादेव कांचन, अमित भाऊसाहेब कांचन, विकास विलास आतकीरे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
सुशांत सुनिल दरेकर, संतोष आबासाहेब कांचन व सुनिल सुभाष कांचन (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
गट क्र २
राजेंद्र रतन चौधरी, मारुती सिताराम चौधरी, लोकेश विलास कानकाटे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी व ताराचंद साहेबराव कोलते (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
गट क्र ३
आप्पासाहेब रंगनाथ काळभोर, राहुल मधुकर काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
अमर उद्धवराव काळभोर, योगेश प्रल्हाद काळभोर व मोरेश्वर पांडुरंग काळे (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
गट क्रं ४
राजीव शिवाजीराव घुले, सुरेश फकीरराव कामठे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
अमोल प्रल्हाद हरपळे व राहुल सुभाष घुले (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
गट क्रं ५
रोहिदास दामोदर उंद्रे, आनंदा देवराम पवार (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
किशोर शंकर उंद्रे व रामदास सिताराम गायकवाड (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
गट क्र ६
शामराव सोपाना कोतवाल, दीपक कुशाबा गावडे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
सुभाष चंद्रकांत जगताप व रमेश जगन्नाथ गोते (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी
सागर अशोक काळभोर (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
संजय सोपानराव गायकवाड (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
अनुसूचित जाती, जमाती
संतोष दत्तात्रय वेताळ (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
दिलीप नाना शिंदे (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
महिला राखीव प्रतिनिधी
सुरेखा मधुकर घुले, संगीता सखाराम काळभोर (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
हेमा मिलींद काळभोर व रत्नाबाई माणिक काळभोर (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
इतर मागास वर्गीय प्रतिनिधी
रोहिदास गोविंद टिळेकर (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
मोहन खंडेराव म्हेत्रे (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी
मारुती किसन थोरात (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)
कुंडलिक अर्जून थोरात (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)